Home देश जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; संघाचा भाजपाला सल्ला

जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; संघाचा भाजपाला सल्ला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दिल्ली : जनतेच्या प्रश्नांबाबत भाजपाने आपला दृष्टिकोन बदलावा, अशी सूचना आर,एस एस संघाने केली आहे. संघाची नोएडा येथे नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत संघाने भाजपान सुचना देल्या आहेत.

लवकरच काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काही प्रश्नांवरून जनतेत भाजपा सरकारबद्दल नाराजी आहे. ही नाराजी निवडणुकीत भोवू शकते, हा धोका लक्षात घेऊन संघाने हा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा : “देगलूरच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम”

केंद्रीय कायद्यांविरोधातले शेतकरी आंदोलन हा विषय भाजपासाठी अडचणीचा ठरू शकतो उत्तरप्रदेशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन शांतपणे हाताळावे, त्याबद्दल संवेदनशील भूमिका घ्यावी, असा सल्ला संघाने भाजपला दिला आहे.

दरम्यान, संघाने याआधीही जाहीरपणे शेतकरी आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पक्षासाठी हे आंदोलन घातक ठरू शकते, असे संघाने म्हटले होते. ‘भाजपाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शांत आणि सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी.’ असं प्रमुख नेत्यांच्या अनेक गटांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान संघाचे संयुक्त सरचिटणीस कृष्ण गोपाल म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“सरकारमध्ये थोडी जर चाड शिल्लक असेल, तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा”

“कोणाच्याही नादाला न लागता पंजाला मतदान करा, शेवटी तुमची कामे मीच करणार”

मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन; पुण्याचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईकडे रवाना