Home पुणे “जो शेतकरीहिताच्या आडवा येईल त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण”

“जो शेतकरीहिताच्या आडवा येईल त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मी महाविकास आघाडी सरकारवर नाराज आणि भाजप सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे, असे काहीही नाही. माझी वाटचाल अशीच राहणार आहे. जो शेतकरीहिताच्या आडवा येईल त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण आहे, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शेट्टी बोलत होते.

पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांची एफआरपीबाबत बैठक पार पडली. जयसिंगपूर येथे 19 ऑक्टोबर रोजी ऊस परिषद झाली. त्यात काही ठराव मंजूर करण्यात आले होते. त्याची प्रत आयुक्त गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. साखर कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाची एकरकमी एफआरपी दिली पाहिजे. त्यात डिसेंबरमध्ये 3 हजार 300 एवढी द्यावी आणि राहिलेली रक्कम जानेवारीपर्यंत द्यावी. ती तुकड्यातुकड्यात दिली जात आहे. शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांकडे 32 महिन्यांपर्यंत राहतात. त्याच्या व्याजाचं काय, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर…, किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा

केंद्रातील भाजप सरकारने साखरेचे भाव 37 रुपये करावेत. तसेच, नाबार्ड ज्याप्रमाणे डेअरी उद्योगाला कर्ज उपलब्ध करून देते, त्याप्रमाणे साखरेला का देत नाही? ही जबाबदारी शरद पवार यांची होती पण साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनले आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

दरम्यान, राज्यात नऊ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. ऊसतोडणी मजुरांच्या गोपीनाथ मुंडे महामंडळाला केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी. ऊसतोडणी मजुरांची नावनोंदणी करावी, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी – 

जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; संघाचा भाजपाला सल्ला

“देगलूरच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम”

“सरकारमध्ये थोडी जर चाड शिल्लक असेल, तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा”