Home क्रीडा सौरव गांगुलीने केली ‘या’ युवा भारतीय खेळाडूची सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी...

सौरव गांगुलीने केली ‘या’ युवा भारतीय खेळाडूची सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी तुलना

265

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची तुलना वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि एमएस धोनी यांच्या सोबत केली

“ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाने साकारलेल्या ऐतिहासिक विजयामध्ये रिषभचे मोठे योगदान होते. ब्रिस्बेन कसोटीत त्याच्या खेळीमुळे भारतीय संघ विजय मिळवू शकला. इंग्लंडविरुद्ध देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने भारताचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग सुकर झाला, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

तो एक मॅचविनर खेळाडू आहे. आपल्या दिवशी तो कोणत्याही परिस्थितीतून संघाला सामना जिंकून देऊ शकतो. माझ्या काळात मी वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग व एमएस धोनी यांनाच अशी कामगिरी करताना पाहिले आहे, असंही सौरव गांगुली म्हणाला.

दरमम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या समस्यांमुळे गांगुली काही काळ दवाखान्यात होता. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर सौरव गांगुलीने एका जेष्ठ क्रीडा पत्रकाराला मुलाखत दिली. यावेळी गांगुलीने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

महत्वाच्या घडामोडी –

हे एक नंबर लबाड सरकार; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

पुण्यात लाॅकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार- अजित पवार

“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा”

“अखेर MPSC परीक्षेची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार परीक्षा”