Home महत्वाच्या बातम्या ‘…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; बसवराज पाटील यांचं मोठं वक्तव्य

‘…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; बसवराज पाटील यांचं मोठं वक्तव्य

232

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

ही बातमी पण वाचा : अजय महाराज बारस्करांचा, मनोज जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

“संपूर्ण देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेतृत्वाखाली चांगले वातावरण निर्माण झालं आहे. देश एका वेगळ्या पद्धतीने सगळ्या विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष देत विकसित होत आहे. देशासाठी आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. देश आणि त्याच्या पाठीमागे एक ताकद उभी करणे आपली जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगलं वातावरण आहे. राज्याला कसं पुढे घेऊन जाता येईल यासाठी खंबीरपणे फडणवीस नेतृत्व करत आहे. या नेतृत्वामागे आपण खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे म्हणून मी प्रवेश करत आहे”, असं बसवराज पाटील म्हणाले.

दरम्यान, आपल्याला कुणाबद्दलही तक्रार नाही, असंही बसवराज पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

“मनोज जरांगेंची अक्कल काढणाऱ्या अजय महाराज बारस्करांना, पक्षाने केलं निलंबित”

“आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा उद्या एक दिवस असेल”