Home महाराष्ट्र “आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा उद्या एक दिवस असेल”

“आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा उद्या एक दिवस असेल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई | महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी उद्या मक विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा पारित केला जाणार आहे.यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा उद्या एक दिवस असेल. मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट घातला जातोय. कायदा तयार करण्याची संहिता आपण विसरलोत का? मराठा आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडे राजकारण होईल, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “…तर मी उध्दव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन”

मला खूप राग आलाय. 50 टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देताय, इतरांना फक्त 37 टक्के जागा उरणार. खुले गुणवंत राहणे गुन्हा आहे का? उद्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. खुल्या प्रवर्गातील लोक देखील मतदार आहेत. ओबीसींच्या बाबतीत कुणबीकरण केले जाऊ शकत नाही, सगेसोयरे कायदा करता येणार नाही”, अशी स्पष्ट भूमिकाही गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

मनोज जरांगेनं मर्यादा ओलांडली, त्याने आपली औकात ओळखावी; नारायण राणेंचा हल्लाबोल

राज ठाकरे देणार एकनाथ शिंदेंना धक्का? शिवसेनेतील ‘हा’ मोठा नेता मनसेच्या वाटेवर