Home क्रीडा “सिंग इज किंग; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी, निर्णायक सामन्यात पंजाबचा मुंबईवर 13...

“सिंग इज किंग; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी, निर्णायक सामन्यात पंजाबचा मुंबईवर 13 धावांनी विजय”

204

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. हा सामना पंजाबने 13 धावांनी जिंकला.

या सामन्यात मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित 20 षटकात 8 विकेट गमावत 218 धावांचा डोंगर उभा केला. पंजाबकडून कर्णधार सॅम करनने 29 चेंडूत 55 धावांची विस्फोटक खेळी केली. सॅमच्या या खेळीत 5 चाैकार, 4 षटकारांचा समावेश होता. तर हरप्रीतसिंग भाटियाने 28 चेंडूत 4 चाैकार, 2 षटकारांसह 41 धावांची खेळी केली. तर जितेश शर्माने 7 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 25 धावांची वेगवान खेळी केली. तर मुंबईकडून पीयूष चावला, कॅमेरून ग्रीनने 2, तर जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडूलकर, जेसन बेहरनडाॅर्फने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकात 6 विकेट गमावत 201 धावाच करू शकला. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने शानदार खेळी करत 43 चेंडूत 6 चाैकार, 3 षटकारांसह 67 धावा केल्या. तर मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुर्यकूमार यादवने तुफानी फलंदाजी करताना 43 चेंडूत 6 चाैकार, 3 षटकारांसह 67 धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने 27 चेंडूत 4 चाैकार, 3 षटकारांसह 44 धावांची खेळी केली. मात्र ते मुंबईला विजय मिळवू देऊ शकले नाहीत. पंजाबकडून अर्शदिप सिंगने घातक गोलंदाजी करताना 4 षटकात 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर नॅथन इलिस, व लियाम लिविंगस्नने 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र

दरम्यान, शेवटच्या षटकात मुंबईला 16 धावांची गरज असताना, अर्शदीप सिंगने केवळ 2 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. आणि पंजाबला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

महत्त्वाच्या घडामोडी –

इतके राजकीय भूकंप झाले, तर मला…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

वरात घेऊन नवरदेवीच्या दारात येताच, नवरदेवासोबत भयंकर घडलं; पहा व्हिडिओ

 “…म्हणून उध्दव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट