सिकंदर रजा, शाहरूख खानची मॅच विनिंग खेळी, पंजाबचा लखनाैवर 2 विकेट्सने विजय

0
185

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लखनाै : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना पंजाब किंग्स विरूद्ध लखनाै सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना पंजाबने 2 विकेट्सने जिंकला.

या सामन्यात लखनाैने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावत 159 धावा केल्या. लखनाैकडून कर्णधार के.एल.राहुलने सर्वाधिक 56 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत राहूलने 8 चाैकार, तर 1 षटकार लगावला. तर कायले मियर्सने 23 चेंडूत 29 धावा केल्या. तर पंजाबकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक 3, कगिसो रबाडाने 2, तर अर्शदिप सिंग, हरप्रीत ब्रार व सिकंदर रजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याचं अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबने हे लक्ष्य 3 चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केलं. पंजाबकडून सिंकदर रजाने 41 चेंडूत 57 धावांची मॅचविनिंग खेळी केली. रझाच्या या खेळीत 4 चाैकार, 3 षटकारांचा समावेश होता. तर मॅथ्यू शाॅर्टने 22 चेंडूत 34 धावा, तर शाहरूख खानने 10 चेंडूत नाबाद 23 धावांची खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या घडामोडी 

“मोठी बातमी! राहुल गांधी, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेणार भेट”

मनसेला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार का? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here