Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याचं अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याचं अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अशातच आता शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांबद्दल मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यानंतर पुरंदरच काय तर महाराष्ट्राचा राजकारण सोप्प होईल, असं मोठं विधान शिवतारेंनी यावेळी केलं. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच  चांगले लोक एकत्र आल्यावर देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्कीच येतील, असं ते म्हणाले. ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “मोठी बातमी! राहुल गांधी, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेणार भेट”

दरम्यान, अजित पवार यांच्याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, ईव्हीएमचा मुद्द्यासह काही मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या विरोधात भूमिका मांडली होती. त्यामुळे अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

मनसेला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार का? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ, नाशिकमधील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”