Home महाराष्ट्र मनसेला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

मनसेला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नवी मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा शिवसेनेतील प्रवेशामुळे नवी मुंबईतील मनसेला मोठा हादरा बसल्याचं बोललं जात आहे.

मनसेचे उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार का? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप करणारे प्रसाद घोरपडे यांनी दीड महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या दिलेल्या राजीनाम्याची मनसेकडून दखल घेण्यात आलेली नव्हती. त्यांची मनधरणी करण्यासाठी मनसेचा एकही नेता त्यांच्याकडे गेला नव्हता. पक्षनेतृत्वानेही गजानन काळे यांना समज दिली नव्हती. त्यामुळे नाराज असलेल्या घोरपडेंनी अखेर हाती धनुष्यबाण घेतला.

दरम्यान, घोरपडे यांनी अखेर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करुन नव्या राजकीय इनिंगची सुरुवात केली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ, नाशिकमधील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीत महाविकास आघाडीसोबत चक्क भाजपची युती; चर्चांना उधाण”

“भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते”