Home नाशिक “ठाकरेंच्या ताकदीत वाढ, नाशिकमधील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ, नाशिकमधील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढली आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन शिवसैनिक महेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली, नाशिक पूर्व मतदार संघातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.

हे ही वाचा : “मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीत महाविकास आघाडीसोबत चक्क भाजपची युती; चर्चांना उधाण”

दरम्यान, यावेळी सुनील बागुल तसेच जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा उपप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी, गोकुळ पिगंळे, प्रेमलता जुन्नरे, मंदा दातीर, स्वाती पाटील आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी 

“भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते”

तेव्हा एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडले होते; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

बाबरी मशीद पडली अन् बाळासाहेबांना फोन आला…; राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ मनसेनं केला पोस्ट