Home महत्वाच्या बातम्या शिवसेनेचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी

शिवसेनेचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर अनेक शिवसेना पदाधिकारी हे शिंदे गटात सहभागी झाले. काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही; नारायण राणेंची भविष्यवाणी 

शिवसेनाप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गद्दार शिवसैनिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष विजय नाहटा या नेत्यांनी शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. या दोन्ही नेत्यांवर कारवाई करत दोन्ही नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

दरम्यान, शिवसेनेने या दोन्ही नेत्यांवर केलेल्या कारवाईसंदर्भात सामना वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच; डॅशिंग नेते वसंत मोरेंचं शिंदे सरकारला आवाहन

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाची नाराजी; अनेकांनी सोडली शिवसेनेची साथ, केला मनसेत प्रवेश

राज ठाकरे हे हिंदूजननायक! त्यांची आणि बाळासाहेबांची भूमिका एकच