Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाची नाराजी; अनेकांनी सोडली शिवसेनेची साथ, केला मनसेत प्रवेश

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाची नाराजी; अनेकांनी सोडली शिवसेनेची साथ, केला मनसेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं.

एकनाथ शिंदे यांचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपद असा प्रवास आहे. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी रिक्षावाला म्हणून शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल 120 रिक्षाचालकांनी मनसेच्या संघटनेत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : राज ठाकरे हे हिंदूजननायक! त्यांची आणि बाळासाहेबांची भूमिका एकच

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून व मनसे पदाधिकारी प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून ठाकुर्ली रेल्वेस्थानक शेजारील रिक्षा स्टँडचे नूतनीकरण करण्यात आलं. याचे उद्घाटन वाहतूक सेनेचे सरचिटणीस अरिफभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हे सर्व रिक्षाचालक महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत सामील झाले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहर संघटक योगेश पाटील, अरुण जांभळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, गेले 30 वर्षे हे सर्व रिक्षाचालक शिवसेनेच्या माध्यमातून या रिक्षा संघटनेत कार्यरत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

फडणवीसांना घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं; विनायक राऊतांचा खोचक टोला

शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

18 पैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येणार; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट