Home महाराष्ट्र मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद शहरच्या नामांतराबद्दल मोठा निर्णय घेतला होता.

औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असं नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र आता या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.

हे ही वाचा : मंगळवेढामध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ निवडणूकीत समविचारी गटानं केली सत्ता स्थापन

उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला होता. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले होते.

दरम्यान, हे तिन्ही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार; मनसेची टीका

शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अजित पवारांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

शिंदे सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार?; आमदार राजू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…