Home महाराष्ट्र मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार; मनसेची टीका

मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार; मनसेची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या काल मुंबईत आल्या होत्या. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मुंबईत आले तर शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतात, अशी एक राजकीय पंरपरा मानली जात होती. पण काल तसं काही घडलं नाही. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीदेखील मुर्मू या मातोश्रीवर गेल्या नाहीत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरून आता मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अजित पवारांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

राष्ट्रपति पदाचे उमेदवार मुंबईत आले की पाठिंब्यासाठी मातोश्रीवर जरूर जातात पण यावेळेस आताचे उमेदवार मा. द्रौपदी मुर्मूजी मुंबईत येऊन देखील मातोश्रीवर का गेल्या नाहीत? मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी मा. उदधवजी जबाबदार आहेत, आजच्या शिवसैनिकांनी अभिमान बाळगायला हवा.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार?; आमदार राजू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

…तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत; निलेश राणेंचा घणाघात

मोठी बातमी! दिपाली सय्यद यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट