Home महाराष्ट्र …तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत; निलेश राणेंचा घणाघात

…तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत; निलेश राणेंचा घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या पुत्रांकडून उद्धव ठाकरेंवर वारंवार टीका करण्यात येत असते. यावरून शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री नारायण राणे स्वतः कधीही अपशब्द काढत नाही. पण त्यांची मुलं लहान आहेत. त्यांना समजवायचं काम फडणवीस साहेब निश्चित करतील. लहान मुलं ट्विट करतात त्यांच्या ट्विटकडे कोणीही पहात नाही, असा टोला केसरकर यांनी यावेळी लगावला. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! दिपाली सय्यद यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

“दीपक केसरकर, आपण युतीमद्ये आहोत, हे विसरू नका. युती टिकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच जबाबदारी तुमच्यावर देखील आहे. तुम्ही शिंदेंच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे, त्यामुळे तुम्ही कशाला उड्या मारता? मतदारसंघात तुमची काय अवस्था आहे, हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्यावर तरी व्यवस्थित चाला, नाहीतर मतदारसंघात तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे, हे विसरू नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे, आम्ही काही गप्प बसणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी यावेळी दीपक केसरकरांना यावेळी लगावला.

दरम्यान, आणि उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल दीपक केसरकरांना तर जाऊन मातोश्रीवर त्यांची भांडी घासा, असंही ट्विट करत राणेंनी केसरकरांवर हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडेंचा समावेश होणार का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

“शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सूरूच; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

राणेंची मुलं लहान, त्यांना समज देण्याचं काम फडणवीस करतील- दीपक केसरकर