Home महाराष्ट्र शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी….

शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या घडामोडींवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही”, असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळ यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे हे आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले? जाणून घ्या

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप; अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?

समृद्धी महामार्गवरील अपघातानंतर खडसेंची फडणवीसांवर टीका; म्हणाले, तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे…