Home जळगाव समृद्धी महामार्गवरील अपघातानंतर खडसेंची फडणवीसांवर टीका; म्हणाले, तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे…

समृद्धी महामार्गवरील अपघातानंतर खडसेंची फडणवीसांवर टीका; म्हणाले, तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : बुलढाण्यात काल मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : समृद्धी महामार्गावर नेमका अपघात कसा झाला; पोलिसांनी सांगितला नेमका घटनाक्रम, म्हणाले…

समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून दुसरीकडे अनेकांचे स्वप्न भंग होत आहेत. आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मात्र इतरांची स्वप्न उद्ध्वस्त करणे चुकीची बाब आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्यांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. या घटनेतील सर्व मृत मयत आत्म्यांना शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

युवक बिरादरीच्या अध्यक्षपदी अभिषेकची फेरनिवड; कार्याध्यक्ष डॉ. राम चढ्ढा , तर कार्यकारी संचालक पदी पंकज इंगोले यांची निवड

एकनाथ शिंदेंना खरंच अटक होणार?; आदित्य ठाकरेंचा मोठा इशारा

 बुलढाणा खाजगी बस अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, दिवसेंदिवस समृद्धी महामार्गावर…