Home अमरावती समृद्धी महामार्गावर नेमका अपघात कसा झाला; पोलिसांनी सांगितला नेमका घटनाक्रम, म्हणाले…

समृद्धी महामार्गावर नेमका अपघात कसा झाला; पोलिसांनी सांगितला नेमका घटनाक्रम, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : बुलढाण्यात काल मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. या अपघातानंतर देशात शोक व्यक्त केला जात आहे.

हा अपघात नेमका कसा झाला, याविषयी अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत. अशातच पोलिसांनी या अपघाताचा घटनाक्रम सांगत माहिती दिली. पोलिसांनी शनिवारी बुलढाण्यात पत्रकारांना याविषयी माहिती दिली.

ही बातमी पण वाचा : युवक बिरादरीच्या अध्यक्षपदी अभिषेकची फेरनिवड; कार्याध्यक्ष डॉ. राम चढ्ढा , तर कार्यकारी संचालक पदी पंकज इंगोले यांची निवड

पहाटे 1.35 वाजल्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला. ही बस आधी समृद्धी महामार्गावरील वीजेच्या खांबाला धडकली. धडकेनंतर बस पुढे आल्यावर डिझेल टँक दुभाजकाला लागला. यामुळे डिझेल टँक फुटला. पुढे बस दुभाजकाला घासत गेली आणि त्यामुळे बस उलटी होऊन आग लागली., अशी माहिती पोलिसांनी यावेळी पत्रकारांना दिली.

दरम्यान, या बसमध्ये एकूण 33 लोक होते. मॅनिफेस्टमध्ये 26-27 लोक होते. काही प्रवासी रस्त्यात येताना घेतले असतील. यापैकी बसच्या काचा फोडून बाहेर पडता आलं, अशा 8 प्रवाशांचा प्राण वाचला आहे. त्यात 25 वर्षीय चालकाचाही समावेश आहे. शेख दानिश शेख इस्माईल असं या चालकाचं नाव आहे,” अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

एकनाथ शिंदेंना खरंच अटक होणार?; आदित्य ठाकरेंचा मोठा इशारा

 बुलढाणा खाजगी बस अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, दिवसेंदिवस समृद्धी महामार्गावर…

मी बीआरएसची ऑफर माध्यमातून पाहिली, पण…; बीआरएसच्या ऑफरवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया