संजय राऊतांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा; नारायण राणेंचा आरोप

0
428

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरुन आता भाजाप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली.

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत, असा आरोप नारायण राणेंनी केला आहे. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता, प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

 ‘…नाहीतर संजय राऊत सुधरणार नाही’; निलेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; 6 पैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष

देवेंद्रजी, 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे; किचन कल्लाकारमध्ये अमृता फडणवीसांचं मिश्किली उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here