Home नाशिक नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; 6 पैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष

नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; 6 पैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीपैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले, 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, तर भाजपला केवळ एका ठिकाणावर समाधान मानावे लागले.

दिंडोरीत केंद्रीय मंत्री भारती पवारांना धक्का बसला असून, येथे नगराध्यक्षपद अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडे गेले आहे. कळवण, देवळा, निफाडमध्ये नगराध्यक्ष बिनविरोध निवडला गेला आहे. कारण या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी फक्त एकेक अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार आणि उपनगराध्यक्षपदी हर्षाली पगार यांची निवड झाली.

हे ही वाचा : देवेंद्रजी, 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे; किचन कल्लाकारमध्ये अमृता फडणवीसांचं मिश्किली उत्तर

निफाडमध्ये शहरविकास आघाडीच्या रूपाली गंधवे आणि उपनगराध्यक्षपदी अनिल कुंदे यांची निवड झाली. देवळा येथे नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती अशोक आहेर आणि उपनगराध्यक्षपदी जितेंद्र आहेर यांची निवड झाली.उर्वरित तीन ठिकाणांपैकी दिंडोरीत शिवसेनेच्या मेघा धिंदळे यांनी बाजी मारली. तर उपनगराध्यक्षपदी अविनाश जावध यांची निवड झाली.

दरम्यान, पेठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यपद गेले. येथे करण करवंदे यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी माकपच्या अफ्रोज शेख निवडल्या. सुरगाण्यात शिवसेनेचे भारत वाघमारे नगराध्यक्ष झाले असून, माकपच्या माधवी थोरात यांनी उपनगराध्यक्ष पद मिळाले.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत हाणा मला, भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी चक्क हातात जोडे घेतले

“संजय राऊतांनी मोठा गाैफ्यस्फोट करण्याचं सांगून सर्वांची निराशा केली, त्यांच्यावर 420 गुन्हा दाखल करा”

“बाॅलिवडूचा डिस्को किंग हरपला, ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन”