देवेंद्रजी, 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे; किचन कल्लाकारमध्ये अमृता फडणवीसांचं मिश्किली उत्तर

0
465

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या झळकणार आहेत.

देवेंद्र फडणवीसही यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. यावेळी पत्नी सुगरण आहे की आई, असा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारल्यामुळे फडणवीसही बुचकळ्यात पडले. तसेच एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी यावेळी दिलं.

हे ही वाचा : संजय राऊत हाणा मला, भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी चक्क हातात जोडे घेतले

दरम्यान, लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं मिश्किली उत्तर अमृता फडणवीसांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राऊतांनी मोठा गाैफ्यस्फोट करण्याचं सांगून सर्वांची निराशा केली, त्यांच्यावर 420 गुन्हा दाखल करा”

“बाॅलिवडूचा डिस्को किंग हरपला, ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन”

पीएमसी घोटाळ्याचा मास्टरमाइंड किरीट सोमय्या, तर त्यांचा मुलगा या मास्टरमांईडचा डायरेक्टर; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here