Home देश संजय राऊत हाणा मला, भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी चक्क हातात जोडे...

संजय राऊत हाणा मला, भर पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी चक्क हातात जोडे घेतले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : अलिबागजवळील कोरलाई गावात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले आपल्या नावावर केले असल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याविरोधात पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी ही बाब नाकारली होती.

अलिबागमधील ती बेनामी प्रॉपर्टी असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. तसेच असे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्यानं मारू, असा इशारा संजय राऊतांनी काल पत्रकार परिषदेत दिला होता. यावरून आता किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : “संजय राऊतांनी मोठा गाैफ्यस्फोट करण्याचं सांगून सर्वांची निराशा केली, त्यांच्यावर 420 गुन्हा दाखल करा”

दरम्यान, नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्यांनी मोठा ड्रामा केला. सोमय्या म्हणाले, त्यांनी हा बंगल्यांचा विषय काल का काढला. संजय राऊत जोड्यांनी मारा म्हणताय किरिट सोमय्याला? अरे जोड्याने मला मारणार तू… असं म्हणत किरीट सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत पायातला जोडा काढला. ‘मला मारायचं असेल तर मला मारा की जोड्यानं.. मी माझाच जोडा देतो संजय राऊतांना.. मी उभा आहे तुमच्यासमोर., असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, 19 बंगल्याच्या वादाप्रकरणी संजय राऊत किरीट सोमय्याला जोडे मारणार असेल तर मी माझा जोडा संजय राऊतच्या हातात द्यायला तयार आहे. त्यानी केलेल्या बंगल्यासंबंधी मी पुरावे दिले आहेत. त्यांनी याबाबत रश्मी ठाकरेंना याबाबत विचारावं..’ असा सल्ला किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“बाॅलिवडूचा डिस्को किंग हरपला, ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन”

“बाॅलिवडूचा डिस्को किंग हरपला, ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन”

ईडीची भिती दाखवता काय?; पण लक्षात ठेवा, आम्ही…; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा