संजय राऊत, पवार कुटूंबाची चाटूगिरी किती करणार, जिभेला आराम द्या; निलेश राणेंचा घणाघात

0
240

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस असे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात”, असं विधान केलं होतं. यावरून  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार? पण श्री पाटील यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन करायचं ठरवलंच असेल, तर त्यांना कोण थांबवणार? असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला., यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

संज्या पवार कुटुंबाची किती चाटूगिरी करणार, जिभेला आराम दे. चंद्रकांतदादांनी अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य इतकं झोमलं की दोन दिवस संज्या त्यावरच बोलतोय. संज्या ते पवार कुटुंब आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील., असा घणाघात निलेश राणे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

100 अजित पवार भाजपाला कसे झेपणार?; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला!

शेवटच्या क्षणी पंजाबचा विजय; रंगतदार सामन्यात हैदराबादला 5 धावांनी हरवलं

पंतप्रधान मोदींचा पेट्रोल पंपावर फोटो; अजित पवारांची खास शैलीत टीका, म्हणाले…

मोदीजी, अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा- राखी सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here