Home महाराष्ट्र “खेडमध्ये राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, म्हणाले, कुणाशी युती नको, कुणाशी भानगड नको”

“खेडमध्ये राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, म्हणाले, कुणाशी युती नको, कुणाशी भानगड नको”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

खेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी राज यांनी दापोली, चिपळून आणि खेड येथील मनसे कार्यकर्त्यांशी पक्षबांधणी संदर्भात संवाद साधला.  तसेच यावेळी राज यांनी खेडमध्ये भाषण करताना स्वबळाचा नारा दिला आहे.

माझ्यासमोर तुम्ही सर्वजण बसला आहात. मला तुमची साथ हवी आहे, अशी माझी अपेक्षा आहे. ऐन मोक्याच्या वेळी मला तुमची साथ हवी आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय की, मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. पण आता नगरपरिषदेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत. आपल्याला कुणालाही बरोबर घ्यायचं नाही. आपल्याला कुणाशी युती नको, ना कुणाच्या भानगडी नको., असं राज ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : 2019 ला बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?: देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

मला खात्री आहे की, आपण मनसे म्हणून खेडमध्ये जेव्हा निवडणुका लढवू, तेव्हा खेडमधील जनता आपल्याला निश्चित यश देईल. आज मी मोठं भाषण द्यायला आलो नाही. आपलं दर्शन झालं हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे., असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे कसा माणूस आहे?; अतुल परचुरे म्हणाले, राज ठाकरेंकडे…

मंत्रीमंडळ विस्तारावर, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, तीन वाटेकरी असल्याने….

उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?; अखेर नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…