Home महाराष्ट्र 2019 ला बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?: देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट,...

2019 ला बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?: देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : राज्यात ठाकरे गट आणि भाजप यांच्यामधील वाद थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान नेमकं काय ठरलं होतं? यावर दोन्हीकडून दावेप्रतिदावे केले जात आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत याबद्दल भाष्य केलं आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड बैठकीत चर्चा झाली होती. या चर्चात नेमकी काय चर्चा झाली , याबद्दल फडणवीसांनी खुलासा केला.

2019 साली भाजप आणि सेनेच पूर्ण बहुमत आलं. मला दुःख आहे. काही लोक शपथ देखील खोटी घेतात. पोहरा देवीला जाऊन त्यांनी खोटी शपथ घेतली असेल, असा टोला फडणवीसांनी यावेळी ठाकरेंना लगावला.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे कसा माणूस आहे?; अतुल परचुरे म्हणाले, राज ठाकरेंकडे…

युतीची बोलणी सुरू होती. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. अमित शहांशी फोनवर बोललो. ठाकरे यांचं म्हणणं आहे की, काही काळ आम्हाला मुख्यमंत्री हवं आहे. मात्र, शाह यांनी सांगितलं मुख्यमंत्री भाजपचा होईल. मंत्री पद जास्त घ्या. ठाकरे म्हणाले हे होणार नसेल तर युती होणं कठीण आहे. तीन दिवसांनंतर एक मध्यस्थी आले. ते म्हणाले ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडला आहे. पालघरच्या जागेची मागणी केली. पालघरची जागा द्या, आपण अनेक वर्ष युतीत आहोत, असा निर्णय झाला., असं फडणवीस म्हणाले.

बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शाह, मी, उद्धव ठाकरे एकत्र होतो. पत्रकार परिषदेत काय बोलायचं याची तालीम झाली. मग वहिनी आल्या. उद्धव म्हणाले त्यांच्यासमोर बोलून दाखवा. मी तोलामोलाच्या शब्दांमध्ये बोललो. त्यावेळी उद्धवजी अनेकदा म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र यांना करायचं आहे. मात्र, नंबर आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं. आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत. त्यानंतर काय झालं तुम्हाला माहीत आहे., असा खुलासा फडणवीसांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मंत्रीमंडळ विस्तारावर, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, तीन वाटेकरी असल्याने….

उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?; अखेर नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

…तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होतील; भाजप खासदाराचं मोठं विधान