Home महाराष्ट्र …तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होतील; भाजप खासदाराचं मोठं विधान

…तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होतील; भाजप खासदाराचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अशातच,  अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे भाजपने अजित पवारांनी भाजपला समर्थन दिलं आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावरून आता भाजप खासदार संजय काकडे यांनी मोठं विधान केलं आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीनंतर आता लवकरच काँग्रेस आमदारांचा नंबर….; रोहित पवारांचं धक्कादायक विधान

अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाबाबतची महत्त्वाकांक्षा कुणापासून लपली नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे अजित पवारांच्या वरिष्ठांशी वाटाघाटी झाल्या असतील, तर ते मुख्यमंत्री होतील. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काय होतंय? हे आपल्याला पाहावं लागेल. अजित पवार गट युतीत सामील झाला असला तरी आगामी निवडणुकीत कुणाला किती जागा मिळतात आणि कोण किती जागा निवडून आणतंय, यावर सगळी आकडेमोड अवलंबून आहे., असं संजय काकडे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा बसणार?; काका-पुतण्या एकत्र येणार?”

मिठाचा खडा टाकणारे शकुनी कोण? ; अमोल कोल्हेंचा नेमका रोष कोणावर

मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी