Home महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तारावर, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, तीन वाटेकरी असल्याने….

मंत्रीमंडळ विस्तारावर, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, तीन वाटेकरी असल्याने….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

मंत्र्यांना शपथ घेऊन 10 दिवस झाले तरी खातेवाटपाचा तिढा मात्र अजून सुटला नाही. हाच तिढा सोडवण्यासाठी आज अजित पवार व प्रफुल्ल पटेल दिल्लीला रवाना झाले आहेत. यावर आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?; अखेर नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

घोडं कुठेच आडलं नाही. आपलं घोडं सरळ चालतंय. काही गोष्टींचा निर्णय व्हायचा आहे. सत्तेत तीन वाटेकरी असल्याने थोड्याफार उणीवा राहणार आहेत. या उणीवा चर्चेनंतर सुटतील. यासाठी वेळ लागतो. याचा अर्थ असा नाही की, घोडं कुठेतरी आडलंय किंवा काहीच होणार नाही. येत्या एक-दोन दिवसांत निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मला खात्री आहे, यामध्ये सगळ्यांना न्याय मिळेल., असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होतील; भाजप खासदाराचं मोठं विधान

राष्ट्रवादीनंतर आता लवकरच काँग्रेस आमदारांचा नंबर….; रोहित पवारांचं धक्कादायक विधान

“मोठी बातमी! राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा बसणार?; काका-पुतण्या एकत्र येणार?”