Home महाराष्ट्र “देवेंद्र फडणवीस राजकारणात सक्रिय झाल्यापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू झालं”

“देवेंद्र फडणवीस राजकारणात सक्रिय झाल्यापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू झालं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकाणात जेव्हा देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले.तेव्हापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू झालं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : “खेडमध्ये राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, म्हणाले, कुणाशी युती नको, कुणाशी भानगड नको”

2014 नंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले. तेव्हापासून किळसवानं राजकारण राज्यात सुरू आहे. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी इतकं घाणेरडं आणि किळसवानं राजकारण कधीही पाहिलं नव्हतं. आज सुडाचं राजकारण सुरू आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना छळलं जात आहे. हा वाईट अनुभव फक्त मला आलेला नाही. तर अनेकांना हा वाईट अनुभव आलेला आहे. जनतेलाही आता या किळसवान्या राजकारणाचा कंटाळा आलाय, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

2019 ला बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?: देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

राज ठाकरे कसा माणूस आहे?; अतुल परचुरे म्हणाले, राज ठाकरेंकडे…

मंत्रीमंडळ विस्तारावर, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, तीन वाटेकरी असल्याने….