“राज ठाकरे यांना सरकारला बोलण्याचा पूर्ण अधिकार, मात्र मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत”

0
169

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतच आहेत, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं.

आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे राज ठाकरे यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत. त्यामुळे मला या सगळ्यावर अधिक काही बोलायचे नाही, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि कांदा उत्पादकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

“ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण”

मानलं पवार साहेब आपल्याला.. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

मुख्यमंत्र्यांबाबत नको ते शब्द वापरल्याने नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here