Home महाराष्ट्र “मराठीमध्ये व्हिडिओ रिल्स बनविणाऱ्यांना, राज ठाकरेंनी दिली ‘ही’ जबाबदारी”

“मराठीमध्ये व्हिडिओ रिल्स बनविणाऱ्यांना, राज ठाकरेंनी दिली ‘ही’ जबाबदारी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली.

या सोहळ्यात सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठी रिल्सस्टारवर महत्त्वाची आणि मोलाची जबाबदारी दिली. राज यांनी यावेळी सोशल मीडिया स्टार विनायक माळी आणि अथर्व सुदामे यांना मंचावर बोलावून त्यांचं कौतुक केलं.

ही बातमी पण वाचा : मंचावर एकत्र असूनही शरद पवारांशी हातमिळवणी न करता का निघून गेलात?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

राज ठाकरे आपलं भाषण सुरु असताना, अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता. तू उभा राहा”, असं राज ठाकरे रिल्सस्टार अथर्व सुदामे याला उद्देशून म्हणाले. तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरंका, अनेकांच्या पाहतो”, असं राज ठाकरे म्हणाले. “ये वर ये”, असं म्हणत राज ठाकरे यांनी, सोशल मीडिया स्टार विनायक माळी आणि अथर्व सुदामे यांना मंचावर बोलावलं.

“अनेक लोकं असतील इथे. माफ करा, भेदभाव नाही. मला समोर बसलेला दिसला म्हणून बोलावलं”, असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. “मला फक्त सांगायचं आहे की, तुमच्यावर आज खूप मोठी जबाबदारी आहे. या महाराष्ट्रात होत असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर तुमच्या रिल्सच्यामार्फत प्रबोधन झालं पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

संभाजी भिडेंना बेड्या ठोका, 6 महिने देशाच्या बाहेर ठेवा; सत्ताधारी पक्षातील आमदाराची संतप्त प्रतिक्रिया

मी तुझ्यासारखा हमाल किंवा भंगार विकणारा नाही; एकनाथ खडसे भाजप आमदारावर भडकले

“आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, सुर्यकूमार नव्हे, हार्दिक नव्हे, तर ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व