Home पुणे मंचावर एकत्र असूनही शरद पवारांशी हातमिळवणी न करता का निघून गेलात?; अजित...

मंचावर एकत्र असूनही शरद पवारांशी हातमिळवणी न करता का निघून गेलात?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्याला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील उपस्थित होते.

पक्ष फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एका सार्वजानिक कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले.  तसेच दोन्ही नेते जवळपास 75 मिनिटं या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अजित पवार वगळता सर्वच नेत्यांनी शरद पवारांशी हातमिळवणी करत संवाद साधला. तसेच हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार गुपचूपपणे शरद पवारांच्या पाठीमागून निघून गेले. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

या सगळ्या घडामोडींवर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवारांचा आदर करतो, त्यामुळे भीतीपोटी मी पाठीमागून निघून गेलो, असं उत्तर अजित पवारांनी दिलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मी शरद पवारसाहेबांचा आदर करतो, त्यामुळे पाठीमागून गेलो. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करताना, भीतीने पाठीमागून जातो. त्याप्रमाणे मीही गेलो. त्यांचा आदर करतो म्हणूनच मी पाठीमागून गेलो., असं उत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

मी तुझ्यासारखा हमाल किंवा भंगार विकणारा नाही; एकनाथ खडसे भाजप आमदारावर भडकले

“आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, सुर्यकूमार नव्हे, हार्दिक नव्हे, तर ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व

संभाजी भिडे यांचं महात्मा गांधीबाबतच्या वक्तव्यावर, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…