Home देश पंजाब हादरलं! आधी कारमध्ये बोलावून घेतलं, त्यानंतर 4 मुलींनी त्याला दारू पाजली,...

पंजाब हादरलं! आधी कारमध्ये बोलावून घेतलं, त्यानंतर 4 मुलींनी त्याला दारू पाजली, आणि त्यानंतर चौघींनीही त्याच्यावर…

838

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंदीगड : पंजाबमध्ये लैंगिक शोषणाची एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंजाब हादरलं आहे.

संबंधित व्यक्ती ही जालंधरमधील एका लेदरच्या फॅक्टरीत कामाला आहे. त्याने असा दावा केला आहे की, कामावरून घरी जात असताना कारमधून जाणाऱ्या चार मुलींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला दारू पाजवून त्याच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार केला, असं त्या व्यक्तीनं म्हटलं आहे.

हे ही वाचा : राज्यपालांचा विषय, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपविला, म्हणाले, महाराज आमचं दैवत, त्यांची तुलना…

कामावरून घरी जात असताना एक पांढरी कार त्याच्याजवळ येऊन थांबली, त्या कारमध्ये चार मुली होत्या. त्यातील एका मुलीने चिठ्ठी काढून त्याला पत्ता विचारण्याचे नाटक केले. तसेच यावेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यात कसली तरी पावडर फेकण्यात आली. त्यानंतर त्या व्यक्तीला समोरचं दिसयाचच बंद झालं. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्या अवस्थेत त्याला कारमध्ये बसवलं आणि त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याचे हात पाय बांधले गेले. तसेच त्या चार मुलींनी अति मद्यप्राशन केले होते, त्यानंतर त्या व्यक्तीला अज्ञात स्थळी घेऊन जाऊन त्यालाही जबरदस्तीने दारु पाजण्यात आली. त्यानंतर तो नशेत असतानाच त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली., असं या व्यक्तीनं म्हटलं.

दरम्यान, त्या चार मुली चांगल्या घरातील दिसत होत्या. कारण त्या चौघीही इंग्रजी आणि पंजाबी भाषेत बोलत होत्या. या घटनेबाबत त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना ही घटना सांगितली. तसेच ही घटना जेंव्हा माध्यमांना समजली, तेंव्हा तुम्ही पोलिसात तक्रार का केली नाही. असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून, पोलिसात तक्रार करु नये, अशी विनंती करण्यात आली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भर सभेत राज ठाकरेंचा उल्लेख करत, सुषमा अंधारेंचा पोलिसांवर निशाणा, म्हणाल्या…

मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण

कोश्यारीजी, माफी मागा, नाहीतर…; शिवाजी महाराजांबद्दल विधानावर, सामनातून इशारा