Home महाराष्ट्र कोश्यारीजी, माफी मागा, नाहीतर…; शिवाजी महाराजांबद्दल विधानावर, सामनातून इशारा

कोश्यारीजी, माफी मागा, नाहीतर…; शिवाजी महाराजांबद्दल विधानावर, सामनातून इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परवा दिवशी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

‘आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’, असं विधान भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून कोश्यारी यांचेवर ताशेरे ओढले आहेत.

हे ही वाचा : अखेर ठरलं! भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार; प्रकाश आंबेडकरांचं ठाकरेंसमोर विधान, चर्चांना उधाण

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल!, असा इशारा सामना अग्रलेखातून यावेळी देण्यात आला आहे.

शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे, असं सामनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राहुल गांधींमुळे महाविकास आघाडी धोक्यात?; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वादग्रस्त विधान, म्हणाले…

मी एका मिनिटात शिवबंधन सोडणार, पण एकच अट…; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान