Home महाराष्ट्र मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण

मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या राजकीय उलथापालथानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात या दोन नेत्यांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली असून, मतदारसंघातील विकासकामासंदर्भात चर्चा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आव्हाड यांच्यासोबत यावेळी मतदारसंघातील आणखी 20 ते 25 स्थानिक नागरिक देखील सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : कोश्यारीजी, माफी मागा, नाहीतर…; शिवाजी महाराजांबद्दल विधानावर, सामनातून इशारा

दरम्यान, या भेटीत जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अखेर ठरलं! भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार; प्रकाश आंबेडकरांचं ठाकरेंसमोर विधान, चर्चांना उधाण

राहुल गांधींमुळे महाविकास आघाडी धोक्यात?; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वादग्रस्त विधान, म्हणाले…