Home नाशिक ब्राम्हण असल्याचा गर्व, परंतु आम्हांला मार्केटिंग करता येत नाही- अमृता फडणवीस

ब्राम्हण असल्याचा गर्व, परंतु आम्हांला मार्केटिंग करता येत नाही- अमृता फडणवीस

326

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही., असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं.

अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे ‘दीपावली स्नेहमिलन 2022’ कार्यक्रम नाशिक येथे झाला. या कार्यक्रमात त्या बोलता होत्या.

हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंगाच्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रभू श्रीरामाचे नाशिकला चरण लागले. या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे. याच पंचवटीत गेल्या बारा वर्षांपासून समाजाच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्या कामाची जबाबदारी डॉ. भारती पवार यांच्यासह स्थानिक आमदार यांच्यावर सोपवते. नेशन फर्स्ट हे आपले ब्रीद असल्याने, शुक्ल यजुर्वेद संस्थेची इमारत उभी करण्यासाठी कोण मध्ये येतो ते मी बघते. जे अधिकारी हे काम थांबवत आहेत त्यांची नावे मला कळवा मी पुढे बघते, असा दमही अमृता फडणवीसांनी यावेळी भरला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार; मंत्री दीपक केसरकरांचं सूचक विधान

“…तर माझ्यासह 5 नगरसेविका शिंदे गटात येण्यास तयार; ठाकरे गटातील नगरसेविकेचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

“आमच्या शिवरायांना विकू नका, नाहीतर…; सामनाचा रोख कुणाकडे?”