Home महाराष्ट्र जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंगाच्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंगाच्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

त्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार; मंत्री दीपक केसरकरांचं सूचक विधान

कोणतीही कारवाई सूडबुद्धीने होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना हे षडयंत्र वाटत असेल तर हे कुणी केलं त्यांना माहिती असेल. राजकीय सूड भावनेने कुठलीही कारवाई नाही हे कायद्याचे राज्य आहे. इथे सगळ्या गोष्टी नियमांच्या आदीन राहून केल्या जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“…तर माझ्यासह 5 नगरसेविका शिंदे गटात येण्यास तयार; ठाकरे गटातील नगरसेविकेचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

“आमच्या शिवरायांना विकू नका, नाहीतर…; सामनाचा रोख कुणाकडे?”

…म्हणून मी, माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ