Home महत्वाच्या बातम्या नाना पटोलेंच्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा; भावी मुख्यमंत्री म्हणत उल्लेख

नाना पटोलेंच्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा; भावी मुख्यमंत्री म्हणत उल्लेख

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भंडारा : राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. अशात सगळ्याच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात काँग्रेस नेत्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा 5 जूनला वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर भंडाऱ्यात लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा दिल्लीत विस्तार; एकनाथ शिंदेंचा केजरवालांना धक्का, आपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

भंडाऱ्यातील जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मदन रामटेके आणि युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, या आधी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनर लागले होते. त्यानंतर आता नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनर लावण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपाच्या हुकुमशाही आणि अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे

“भाजपवर मोठी शोककळा, माजी आमदार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन”

भाजपाने २०१९ साली शिवसेनेबरोबर युती करण्याची गरज नव्हती; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य