Home महाराष्ट्र भाजपाच्या हुकुमशाही आणि अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे

भाजपाच्या हुकुमशाही आणि अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची मते आजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसांच्या या बैठकीनंतर लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्याचे दौरे केले जातील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. बैठकीनंतर टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, निवडणुका केव्हाही लागल्या तरी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यादृष्टीने आढावा बैठकीत स्थानिक नेत्यांकडून माहिती घेतली जात आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “भाजपवर मोठी शोककळा, माजी आमदार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन”

विदर्भासह राज्यात विविध भागात काँग्रेसला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहेत. भाजपाला जो पराभूत करु शकेल त्यालाच उमेदवारी दिला जावी असा एकंदर सुरू आहे. महाविकास आघाडीने एकास एक उमेदवार दिला तर भाजपाचे पानिपत करणे सोपे जाईल. भाजपाच्या हुकुमशाही, मनमानी व अत्याचारी सरकारला जनता कंटाळली आहे. जनतेला बदल हवा आहे, देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून यावेळी राज्यात व दिल्लीतही बदल होईल हे चित्र आहे, असंही नाना पटोलेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपाने २०१९ साली शिवसेनेबरोबर युती करण्याची गरज नव्हती; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

“…तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री असते; राष्ट्रवादीच्या आमदारानं मनसेला डिवचलं”

पंकजा मुंडेंशी बंदद्वार चर्चेनंतर एकनाथ खडसे यांची भूमिका बदलली, म्हणाले…