“आता मनसेचा शिवसेनेला दणका; कोकणातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश”

0
2108

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

खेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. पक्षात जास्तीत जास्त नागरिकांना सामावून घेण्याचे प्रयत्न प्रत्येक स्तरावर केले जात आहे.

हे ही वाचा : ‘या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?; भाजप आमदाराची राज्य सरकारवर टीका

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होवून खेड शहर शिवसेनेचे विभाग अध्यक्ष संदिप सासणे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. तसेच सासणे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये शिवसेनेनं मनसेला धक्का देत मनसैनिकांना पक्षात समावेश करून घेतलं होतं. आता मनसेनंही जोरदार पलटवार करत शिवसेनेला मोठा धक्का देत अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश करून घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

अप्पा, वंचितांच्या कल्याणाचा वसा आजही आमच्यात, तो प्राणपणाने जपणार; धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली

शरद पवार हे पाॅवर हाऊस, त्यांचा नेम अचूक; जयंत पाटलांकडून स्तुतीसुमने

“गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here