Home महाराष्ट्र “गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण”

“गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आज असते, तर युती कायम राहिली असती, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळं राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : बाळासाहेब आज असते तर त्यांनी संजय राऊतला लाथ मारून हाकललं असतं; निलेश राणेंचा घणाघात

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, आज भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केलं. यशवंतरावानंतर पवार हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व असल्याचे राऊत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘याचा अर्थ दिवाळीत फोडलेले सर्व फटाके फुसके होते’; सदाभाऊ खोत यांचा मलिकांना टोला

संजय राऊत नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच समजत नाही; नारायण राणेंचा टोला

भाजपला पराभूत करण्यासाठी निवडणुकांमध्ये 99 टक्के आघाडी होणारच- जितेंद्र आव्हाड