Home महत्वाच्या बातम्या नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते, पण…;...

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते, पण…; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते. पण, ही बातमी संजय राऊतांनी फोडली आणि शरद पवारांना सांगितली. त्यामुळे जनतेनं ज्या युतीला मतदान केलं होतं, ती होऊ शकली नाही.असा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते, तर चांगलं चित्र निर्माण झालं असतं. तसेच, शिवसेनेची फूटही टळली असती, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरेंचं मत हिंदुत्वाबरोबर जाण्याचं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंची दिशाभूल करण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर मी स्वत: पाहिलेला आहे, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ; मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, आरोग्य विभागाला केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना धक्का

अभिनेत्री कंगणा राणावत उतरणात निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून लढण्याची शक्यता