Home महाराष्ट्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट ; मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, आरोग्य विभागाला केल्या ‘या’ महत्वाच्या...

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ; मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, आरोग्य विभागाला केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली.

राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना धक्का

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अभिनेत्री कंगणा राणावत उतरणात निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून लढण्याची शक्यता

धक्कादायक! पुण्यात भाजप नेत्याची आत्महत्या; रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

मोठी बातमी; सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतून निलंबन