Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना धक्का

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना धक्का

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळ यांच्या अडचणींत वाढ होणार आहे. या प्रकरणातील खटल्यातील आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन आरोपी अटकेत आहेत. या तिनही आरोपींनी आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर निर्णय घ्यावा, ही या तिघांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : अभिनेत्री कंगणा राणावत उतरणात निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून लढण्याची शक्यता

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज सादर केला होता.

दरम्यान, विद्यमान मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी याप्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र ही सुनावणी थांबवून माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

धक्कादायक! पुण्यात भाजप नेत्याची आत्महत्या; रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

मोठी बातमी; सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतून निलंबन

102 डिग्री ताप, अनेकवेळा उलट्या; जाणून घ्या आता कशी आहे दाऊदची तब्येत