Home नाशिक “नाशिकमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन; रस्त्यावर पिंडदान करत केली ‘ही’ मोठी मागणी”

“नाशिकमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन; रस्त्यावर पिंडदान करत केली ‘ही’ मोठी मागणी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आपल्या खळखट्याक आंदोलनासाठी ओळख असलेली मनसेनं आज नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा नवखा प्रयत्न केला.

नाशिकच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नाशिक शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यावरून मनसेने निवेदन देत अनेकदा खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. परंतु, मागणी वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने मनसेनं पितृपक्षाचा मुहूर्त शोधत रस्त्यावरील पिंडदान करत आंदोलन केलं आहे.

हे ही वाचा : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..

पितृपक्षात पिंडदान करून स्वर्गवासी झालेल्या नातलगांना विविध प्रकारच्या भाज्यांचा नैवद्य दाखवत पूजाविधी केला जातो. अगदी तसाच प्रयत्न करत मनसेने आंदोलन केलं आहे. दरम्यान, मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची नाशिकमध्ये चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा; काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम

“शिंदे-फडणवीस सरकार ‘या’ तारखेला कोसळणार”

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा निसटला?; राज ठाकरेंचा सवाल, आता एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…