Home महाराष्ट्र सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा; काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम

सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा; काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम

320

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज  निवडणुक पार पडली.  या निवडणुकीत सभापती पदी भाजपचे धीरज सूर्यवंशी निवडून आलेत. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संतोष पाटील  यांचा त्यांनी 9 विरुध्द 5 मतांनी पराभव केला.

महापालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी होते. भाजपकडून धीरज सुर्यवंशी तर आघाडीकडून फिरोज पठाण व संतोष पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. आघाडीच्या पठाण यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सूर्यवंशी व पाटील यांच्यात थेट लढत झाली.

हे ही वाचा : “शिंदे-फडणवीस सरकार ‘या’ तारखेला कोसळणार”

समितीत भाजपचे 9 काँग्रेसचे 4 तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. प्रत्यक्ष मतदानावेळी राष्ट्रवादीचे संगीता हारगे व पवित्रा केरीपाळे हे दोन सदस्य गैरहजर राहिले. केवळ डॉ. नर्गिस सय्यद सभागृहात उपस्थित होत्या. भाजपचे 9 तर काँग्रेसचे सर्वच्या सर्व 4 सदस्य उपस्थित होते. भाजपच्या सूर्यवंशी यांना 9 तर आघाडीच्या पाटील यांना केवळ 5 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी डुडी यांनी सूर्यवंशी यांना विजयी घोषीत केले.

दरम्यान,  महापौर, उपमहापौर निवडीवेळी राष्ट्रवादीने जे पेरल, तेच उगवले, असा टोला धीरज सूर्यवंशी यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा निसटला?; राज ठाकरेंचा सवाल, आता एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“बंडखोरीचा शिवसेनेला फायदा; शेकडो वकिलांनी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

मनसेच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचा आरोप; निवडणुकीत तिकीट देण्याचं आमिष दाखवून घेतला गैरफायदा