Home महाराष्ट्र “बंडखोरीचा शिवसेनेला फायदा; शेकडो वकिलांनी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

“बंडखोरीचा शिवसेनेला फायदा; शेकडो वकिलांनी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या बंडामुळे आता शिवसेनेत 2 गट पडले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा तर दुसरा गट उद्धव ठाकरेंचा.

तसेच पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे मुंबई महापालिकेवर सत्ता कायम राखण्याचं मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मात्र अशातच आता शिवसेनेचं बळ वाढलं आहे. कारण शेकडो वकिलांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा : मनसेच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचा आरोप; निवडणुकीत तिकीट देण्याचं आमिष दाखवून घेतला गैरफायदा

काल रात्री शेकडो वकिलांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं. तसेच शिवसेनेने शिव विधी आणि न्यायसेना महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना केली आहे. ही संघटना म्हणजे शिवसेनेची वकील संघटना असेल. यामार्फत गरजू नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या संघटनेची घोषणा करण्यात आली. तसेच पुढील महिन्यात तीन ते चार हजार वकील या संघटनेत असतील, असंही यावेळी सांगण्यात आलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये; राज ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…

नितेश राणे म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट म्हणजे फडणवीस; आता शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा पलटवार, म्हणाले…