Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये; राज ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये; राज ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये हलिण्यात येणार आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून महाविकास आघाडीतील नेते शिंदे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर टीका केली आहे.

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा संतप्त सावल राज ठाकरे यांनी केला आहे.

हे ही वाचा: नितेश राणे म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट म्हणजे फडणवीस; आता शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा पलटवार, म्हणाले…

दरम्यान, हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिंदे गटातील 17 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लवकरच मातोश्रीवर परतणार”

“एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल ‘इतके’ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश?”

मोठी बातमी! भ्रष्टाचार प्रकरणात भाजपचा ‘हा’ बडा नेता ईडीच्या रडारवर