Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा निसटला?; राज ठाकरेंचा सवाल, आता एकनाथ शिंदेंची पहिली...

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा निसटला?; राज ठाकरेंचा सवाल, आता एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये हलिण्यात येणार आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून महाविकास आघाडीतील नेते शिंदे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर टीका केली आहे.

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा संतप्त सावल राज ठाकरे यांनी केला आहे. यावर शिंदे यांना प्रश्न विचारला असता, तेंव्हा त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.

हे ही वाचा : “बंडखोरीचा शिवसेनेला फायदा; शेकडो वकिलांनी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

आमचं सरकार येऊन दोनच महिने झालेत. पण गेल्या दोन वर्षांत वेदांता फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला गेला असावा, अशी शंका शिंदेंनी यावेळी उपस्थित केली.

दरम्यान, इतकंच नव्हे तर हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न केलेत, असंही शिंदे म्हणाले. या प्रकल्पासाठी कंपनीला पुण्यात तळेगाव इथं जागा देण्यात आली होती. वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या चेअरमनसोबत बैठकही घेतली होती. या बैठकीच्या माध्यमातून 30-35 हजार कोटी रुपयांची सवलत देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते, यात काही सबसिडींचाही समावेश असल्याची माहितीही शिंदेंनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मनसेच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचा आरोप; निवडणुकीत तिकीट देण्याचं आमिष दाखवून घेतला गैरफायदा

भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये; राज ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…