Home महाराष्ट्र राज ठाकरेंना खाज ठाकरे बोलणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

राज ठाकरेंना खाज ठाकरे बोलणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली.

राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं होतं. नंतर ठाण्यातल्या उत्तर सभेत त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

हे ही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी,नाहीतर…”; ‘या’ आमदाराचा राज ठाकरेंना इशारा

राज ठाकरे पेट्रोल, गॅस, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाईमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाज साहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कुणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं, असा टोला मिटकरींनी राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात बोलताना लगावला होता. यावरून आता मनसेनं पलटवार केला आहे.

राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचं काय समजलं?, असं जोरदार प्रत्युत्तर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘मनसे’ची आणखी एक घोषणा; अक्षय्य तृतीयेला करणार…

राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका

“कोल्हापूरातील विजयानंतर जयश्री जाधव पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण”