Home महाराष्ट्र राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका

राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. तर राज यांच्या या घोषणेनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी सुभाष पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी जोरजोरात भाषण केले. मात्र त्यानंतर झालेल्या मतदानात त्यांना केवळ 17 हजार मते पडली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेत लोक फक्त ते काय बोलतात आणि कशी नक्कल करतात हे ऐकण्यासाठी येतात, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : शिवसेनेच्या ‘या’ आमदारांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, पुण्याच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन मोठ्या गोष्टींची घोषणा केली. ज्यात 1 मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा तर 5 जूनला आयोध्या येथे भेट देणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत सध्या नैराश्येत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस

मी, बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त, अंध भक्त नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

आयत्या बिळात नागोबा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला